‘या’ कृषीउत्पन्न बाजार समितीमधील शेड मधून सोयाबीनच्या गोण्या झाल्या लंपास

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील कृषीउत्पन्न बाजार समीती मधील निलाव शेड मधून सोयाबीनच्या 12 गोण्या सुमारे 30 हजार रुपयेचा मुद्देमाल चोरी गेला आहे.

चोरटे मुद्देमाल चोरुन नेताना सी.सी.टीव्ही कॅमेरे मध्ये आढळून आले आहे. याप्रकरणी नानासाहेब सोपान रनशुर यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर दादा सोनवणे रा. धारणगाव ता. कोपरगाव यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कृषीउत्पन्न बाजार समीती कोपरगाव येथील निलाव शेड मध्ये सुमारे 150 गोण्या होत्या.

बाजार समितीचे सचिव नानासाहेब सोपान रनशुर हे बाजार समीती कोपरगाव येथे आले असता त्यांना संतोष ज्ञानदेव सांगळे या व्यापारीने सदर निलाव शेड मधुन सोयाबिनच्या 12 गोण्या चोरीस गेले बाबत सांगितले.

त्यांनी सदर ठिकाणी जावुन पाहीले त्यावेळी निलाव शेडमधील सोयाबिनच्या 150 गोण्या पाकी 12 गोण्या कमी दिसल्या.

तेव्हा त्यांनी सी.सी.टीव्ही कॅमेरा चेक केला असता ज्ञानेश्वर दादा सोनवणे या इसमाने एका गाडीतुन सोयाबिनच्या 12 गोण्या म्हणजे चोरुन नेल्याच्या आढळून आल्या. असे फिर्यादीत म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe