अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी!

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील एका गावात घडली होती. या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे.

दरम्यान आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावात १६ नोव्हेंबर रोजी पिडीत अल्पवयीन मुलीची आई शेतात कांद्याच्या पिकास पाणी देत होती.

त्यावेळी जवळच असलेल्या आरोपी पोपट फुंदे यांच्या संत्र्याच्या बागेत त्या मुलीची शेळी गेली. ती शेळी आणण्यासाठी मुलगी गेली होती. त्यावेळी पोपट फुंदे याने मुलीचा विनयभंग केला.

याप्रकरणी १९ नोव्हेंबर रोजी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोपट म्हातारदेव फुंदे याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेला १५ दिवस उलटूनही आरोपीस अटक होत नसल्याने मराठा सेवा संघाच्या वतीने आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News