अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसेसह दोन तरूणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम परिसरात विजय हॉटेलसमोर पोलिसांनी ही कारवाई केली.
महेश काशिनाथ काळे (वय 25 रा. जामगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद), आण्णासाहेब शिवाजी कोल्हे (वय 21 रा. मुलानी वडगाव ता. पैठण जि. औरंगाबाद) अशी पकडलेल्या तरूणांची नावे आहेत.

त्यांच्याकडून दोन स्टिलचे गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे, दोन मोबाईल असा 91 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी काळे व कोल्हे विरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे
यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम