अहमदनगर ब्रेकींग: पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- अन्न प्रशासन व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गोवा कंपनीचा गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला.

बोल्हेगाव उपनगरात आदेश लाॅन जवळ रात्री दोन वाजता ही कारवाई केली. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा असून मोजदाद सुरू आहे.

बोल्हेगाव उपनगरात गुटखा असलेला टेम्पो उभा असल्याची माहिती अहमदनगर शहर अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांना मिळाली होती.

अन्नसुरक्षा अधिकारी पवार यांनी नमुना सहायक प्रसाद कसबेकर यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गवारे, अकोलकर यांना सोबत घेत टेम्पो पकडला.

पथक आल्याची चाहूल लागताच टेम्पो चालक पसार झाला. पकडलेला टेम्पो अन्न प्रशासन कार्यालय आणला आहे.

त्याठिकाणी गुटख्याची मोजदाद सुरू असून यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अन्नसुरक्षा अधिकारी पवार यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe