प्रभाग 9 च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून ऋषीकेश गुंडला इच्छुक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- पस्थितीमध्ये झालेल्या मुलाखतीत प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडला यांनी या निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. प्रभाग 9 हा पद्मशाली बहुलभाग असून, यामध्ये सामाजिक कार्य सातत्याने सुरु आहे.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी नवस करुन 2014 व 2019 मध्ये दोन वेळा सायकलवर शिर्डीला जाऊन साईबाबा चरणी प्रार्थना केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार करुन प्रभागात कार्यरत राहणार असून, सेवक म्हणून कार्य करणार आहे.

तर प्रभागातील नागरी प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षाचे ध्येय धोरण घरा-घरात पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना गुंडला यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe