अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळविले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने राहत्या घरातून पळून नेल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडली आहे.

या प्रकारामुळे हारेगाव भागातील पालक वर्गात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार गायकवाड या करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe