25 एकर ऊस जळाला सुदैवाने 150 एकर जळण्यापासून वाचला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  अचानक ऊसाला आग लागल्याने सुमारे २५ एकर ऊस जळाल्याची घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारामध्ये घडली आहे.

तर ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या तत्परतेने हे आग आटोक्यात आणण्यात आल्याने सुमारे परिसरातील दीडशे एकर ऊस क्षेत्र हे जळीत होण्यापासून वाचले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील पुंजाहरी मुंगसे, भाऊसाहेब पवार या शेतक-यांच्या ऊसाला सोमवारी दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली.

या आगीत सुमारे २५ एकर उस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस पंकज आढाव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली.

काही वेळातच गावातील सुमारे शेकडो गावकरी मदतीसाठी धावले व उसाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले.

ग्राम सुरक्षा यंत्रणा आणि ग्रामस्थांची तत्परता यामुळे परिसरातील सुमारे १५० एकर ऊस वाचविण्यात यश आले. सदर आग का लागली हे माञ उशीरापर्यंत समजू शकले नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पिकांना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News