पोस्टाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला मिळू शकतो चांगला परतावा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- बँकेच्या मुदत ठेव योजनेची निवड आपण गुंतवणुकीसाठी करतो, या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत राहाते. तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर एक ठराविक रक्कम देखील मिळते.

या योजनेतून बऱ्यापैकी परतावा मिळत असल्याने अनेक जण एफडी करतात. मात्र कोरोनाच्या काळात अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दरात मोठी कपात केली आहे.

असे असले तरी त्या तुलनेमध्ये पोस्टाच्या अशा अनेक स्कीम आहेत ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. ‘मुदत ठेव योजना’ बँकेप्रमाणेच पोस्टामध्ये देखील मुदत ठेव योजना एफडी असते.

ज्यामध्ये तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही पोस्टाच्या या योजनेमध्ये एक हजार रुपयांपासून पुढे कितीही रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवू शकतात.

तुम्ही ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला 6.7 टक्के वार्षिक दराप्रमाणे व्याज मिळते. सोबतच तुमच्या एफडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe