अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती अखेर डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी हे जाहीर केले.
दरम्यान आ. लहू कानडे यांच्या उपस्थितीत मुरकुटे यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला आहे. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दि 18 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केलेला होता.
त्याप्रमाणे निवडणूकही घेतण्यात आली. मात्र न्यायालयाच्या आदेशान्वये हा निकाल राखीव ठेवण्यात आला होता.
या विरोधात पंचायत समितीचे सदस्य दीपक पटारे यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद येथे पिटीशन दाखल करून निवडणूक कार्यक्रमावर आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओबीसी आरक्षण हे क्षमतेपेक्षा अधिक असल्याने निकाल जाहीर करण्या संदर्भात स्थगिती मिळवली होती.
न्यायाधिशांनी सदर अपील फेटाळून लावत डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापती पदाचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात आदेश जिल्हाधिकार्यांना केले.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी अनिल पवार यांनी डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांची श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती निवड जाहीर केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम