अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार 41 टक्के पगारवाढीसह19 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत.कामावर हजर झालेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नव्या सुधारित वेतनश्रेणीनुसार पगार दिला आहे.
जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांच्या खात्यात आज पगार जमा झाले आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, हे आधीच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.एक महिना उलटून गेला तरी तब्बल ७२ हजार एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत.
राज्यात दुपारपर्यंत 250 पैकी 123 डेपोमध्ये वाहतूक सुरू झाली आहे. राज्यात निलंबित कर्मचाऱ्यांची संख्याही जवळपास 10 हजारांच्या आसपास गेली आहे,
तर सेवासमाप्तीची कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही तब्बल 2 हजारांच्या वर गेली आहे. एसटी संपकरी कर्मचार्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देताना परिवहन मंत्री अनिल परब
यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता २८% करण्यात आला, घरभाडे भत्ता ८-१६-२४ या पटीत वाढवून देण्यात आला. तसेच अंतरिम वेतन वाढ देखील दिली. अशी माहिती देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम