तहसील कार्यालयासमोर दोन गट भिडले; एकमेकांच्या डोळ्यात फेकली मिरची

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुफान दगडफेक झाली. यामध्ये दोन ते तीन जणांच्या डोक्याला मार लागुन ते जखमी झाले आहेत.

या भांडणामध्ये एकमेकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्यात आली. तहसील कार्यालयासारख्या एवढ्या गजबजलेल्या परिसरात अचानक झालेल्या या तुफान दगडफेकीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

यावेळी दगडफेकीत तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेल्या काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. कामानिमित्त येथे आलेल्या काही लोकांना देखील या दगडफेकीत दगड लागले आहेत.

नेमक्या कोणत्या कारणातून हा वाद झाला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समजली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe