अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- आई वडीलांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील एका गावात घडली असून
याबाबत सोमवार 6 डिसेंबर रोजी एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी तालूक्यातील एका गावात सदर मुलीचे वडील आपल्या कुटूंबासह राहत आहे.

ते मोल मजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. दिनांक १ डिसेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणेच सदर कुटुंबातील लोकं जेवण करुन झोपी गेले होते.
२ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील झोपेतून उठले. त्यावेळी त्यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा घरातील लोकांनी आजू बाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला.
मात्र ती मिळून आली नाही. दरम्यान राहुरी तालुक्यातील सडे येथील अक्षय विलास पवार (वय २१ वर्षे) या तरूणाने त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडीलांच्या कायदेशीर रखवालीतुन फूस लावून पळवून नेले.
अशी त्या मुलीच्या वडिलांना खात्री झाली. त्यांनीराहुरी पोलिस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय विलास पवार या तरूणा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













