अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- देशातील सोने आयातीने सर्व विक्रम मोडून काढले आहेत. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या अवघ्या १० महिन्यांत ३,४५,३०३ कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले.
आयातीचा सध्याचा सरासरी कल असाच सुरू राहिल्यास डिसेंबरपर्यंत हा आकडा ४ लाख कोटींच्या पुढे जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकाच वर्षात सोन्याच्या आयातीवर एवढा खर्च कधीच झाला नव्हता.

यापूर्वीचा विक्रम २०१७ चा आहे. त्यावेळी देशात २.३६ लाख कोटी रुपयांचे सोने आयात करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात मोठी घसरण झाली आहे.
त्यामुळे मूल्याच्या दृष्टीने सोन्याच्या आयातीचा आकडा खूप मोठा झाला आहे. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये, एका डाॅलरची किंमत ६० रुपये होती आणि सोन्याची किंमत देखील प्रती १० ग्रॅम २८ हजार रुपये होती.
त्या तुलनेत डॉलरचे मूल्य ७५ रुपयांच्या वर असून सोन्याचा दर ४८ हजार रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. साहजिकच सोन्याच्या आयातीचे मूल्य जास्त असल्याचे दिसून येईल.
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, २०२१ मध्ये सोन्याच्या आयातीत वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण सुरक्षित गुंतवणूक त्यामुळे माेठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे.
साेन्याची आयात वाढण्याची तीन कारणे अशी
२०२० मध्ये लाॅकडाऊनमुळे मागणी जवळपास ठप्प हाेती, जी या वर्षी वाढली या दरम्यान साेन्याच्या किंमतीत जवळपास ७१ टक्क्यांनी वाढ झाली २०१४ पासून आतापर्यंत डाॅलरच्या तुलनेत रुपया २५ टक्क्यांनी कमकुवत झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













