महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यातच लाचार-बेजबाबदार अधिकारी कर्मचारीही करताहेत बोगस नियमबाह्य फेरफार नोंदी !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारला सर्वत्र घोटाळ्यांच्या आरोपाने घेरले आहे. या महाविकास आघाडी सरकारमध्ये महा-घोटाळे, भ्रष्टाचार माजला आहे.

नगर जिल्ह्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच लाचार व बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी करताहेत बोगस व नियमबाह्य फेरफार नोंदी ही गंभीर बाब असतांना देखील शासन दखल घेत नाही, ही शरमेची बाब आहे. याबाबत नगर तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सचिन एकनाथ एकाडे, उपाध्यक्ष शाम नामदेव कोके यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयाकडे एक निवेदन व माहिती अधिकारामध्ये उघडकिस आलेल्या फेरफार नोंदी.

कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, कुळकायदा अव्वल कारकुर, तहसिलदार, यांनी संगनमताने केलेला बोगस कारभाराबाबत माहिती दिली. या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत निवेदनात त्यांनी नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथील गट नं.123/2 वरील स्थित खातेदार यांच्या नावासमवेत समाईकातील देवी ईनाम वहिवाटदार नावाची नोंद कलम – 155 खाता दुरुस्ती प्रक्रियेतून कमी करावयाची कार्यवाही करताना खातेदाराचा अर्ज, 7/12, जुने फेरफार व जुने 7/12 अथवा वरिष्ठांचा आदेश न घेता निमगांव वाघा

येथील तलाठी प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांनी दि.19/10/2021 च्या भ्रमणध्वनीवरील दिलेल्या कबुलीनुसार मौजे माळीवाडा कोतवाल तथा तहसिल कार्यालय, नगर येथील डी.बी.ए. सहाय्यक डी.आर. परदेशी यांनी सदर वरील विवादग्रस्त नोंद घेतल्याचे कबुल केले,

त्यानंतर डी.बी.ए.सहाय्यक पदापोटी व कार्यापोटी डी.आर.परदेशी यांनी तहसिलदार नगर यांची या नोंदी करीता मान्यता व थम घेतला. तसेच नोंदीचे परिशिष्ट आदेश क्र.क.155/खाता दुरुस्ती/1247/2021 दि.26/07/2021 जाली स्वरुपात तयार केले. तसेच खाता दुरुस्ती फेरफार क्र.5732 तयार करण्यात आला.

सदर परिशिष्टावर तलाठी निमगांव वाघा नामे प्रमोद दत्तात्रय गायकवाड, मंडलअधिकारी चास नामे व्ही.डी.पवार, अव्वल कारकुन कुळकायदा तहसिल कार्यालय नगर व स्वत: तहसिलदार नगर नामे उमेश शिवाजीराव पाटील या सर्वांनी उपरोक्त परिशिष्ट आदेशाची पडताळणी अंती सर्वांनी स्वाक्षर्‍या केल्याचे दिसते.

खाता दुरुस्ती फेरफार क्र.5732 तयार करतांना 7/12 वरील खातेदारासमवेत समाईकातील असलेले देवी ईनाम वहिवाटदार नामे असलेला खाता नं.51352 ही नोंद बंद करुन कंस केला व नवीन खाते नं.51738 जाली स्वरुपात तयार करुन फक्त खातेदार

यांचे नाव गट नं.123/2 वरील 7/12 सदरी आणून मुळशी पॅटर्न प्रमाणे 7/12 कोरा व क्लिअर करुन दिल्याचे तक्रारदार यांच्या तक्रारीमध्ये नमुद आहे. वरील बोगस फेरफार प्रकरणी मोठ्या प्रमाणात तक्रार जिल्हाधिकारी, अहमदनगर व वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाखल आहे.

त्यामधील तक्रारदार सदानंद गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये नमूद असल्याप्रमाणे वरील अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार करुन 10 ते 12 लाख रुपये गट नं.123/2 वरील स्थित खातेदाराकडून घेऊन खाता दुरुस्ती फेरफार क्र.5732 घेतल्याचे तक्रार अर्जामध्ये नमुद आहे.

तहसिलदार नगर यांनी दिलेल्या आदेश क्र./कावि.कुका-2/70/2021 दिनांक 24/10/2021 नुसार मौजे निमगांव वाघा येथील खाता दुरुस्ती फेरफार क्र.5732 बाबत निवासी नायब तहसिलदार, अव्वल कारकुन, लिपिक यांची संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करणार असल्याचे नमुद आहे.

परंतु अद्यापही कोणतीही कार्यवाही उपरोक्त कर्मचारी व अधिकारी यांच्यावर करण्यात आली नाही. तरी या दोषींवर निलंबानाची व फौजदारी कार्यवाही करावी, नाही तर मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्या दालनात अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे तक्रारदार यांनी निवेदनात नमुद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe