परराज्यातील तिघांनी नगरच्या कांदा व्यापाऱ्याला 34 लाखांना गंडवले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- आंध्र प्रदेशमधील तिघांनी नगर शहरातील कांदा व्यापार्‍याचा विश्वास संपादन करून त्याला 34 लाखांचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 39 रा. सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान चिपाडे यांच्या दाखल फिर्यादीवरून बी. रामकृष्णा, पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजू (तिघे रा. गाजुवाका, जि. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चिपाडे यांची बी. रामकृष्णा, त्याचा कारभार पाहणारे पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजु यांच्याशी ओळख झाली. चिपाडे यांनी 18 जून 2020 रोजी ट्रकने 25 टन कांदा रामकृष्णा याला पाठविला. चिपाडे यांना रामकृष्णा याने 25 टन कांद्याची रक्कम टप्प्याटप्याने पाठविली. यादरम्यान त्याने विश्वास संपादन केला.

22 जून 2020 ते 6 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यास 40 ट्रक कांदा प्रत्येकी 25 टन असा एकूण 10 लाख टन कांदा त्यास पाठविला. या मालाची एकूण किंमत 2 कोटी 6 लाख 91 हजार 447 रूपये इतकी झालेली असताना

त्याने टप्पाटप्प्याने 1 कोटी 72 लाख 88 हजार 500 रूपये आरटीजीएस व बँक खात्यात जमा केले. उर्वरीत 34 लाख 2 हजार 947 रूपयांची रक्कम दिली नाही. याप्रकरणी कोतवालीत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe