एसटीच्या तब्बल ८० हजार संपकरी कर्मचाऱ्यांना बसला वेतन कपातीचा फटका

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेल्या वेतनवाढीसह सुधारित वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सोमवारपासून जमा झाले आहे. मात्र जे कर्मचारी संपात सहभागी आहे त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे.

तर संपात सहभागी नसलेल्या सुमारे १० हजारांहून अधिक कामगारांना वेतनवाढीसह १०० टक्के सुधारित वेतन मिळाले आहे. तर गेल्या महिन्याभरापासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी संप सुरू आहे.

या संपात सहभागी असणाऱ्या तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा फटका बसला आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही.

मात्र, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून मोठी वेतनवाढ आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारपासून एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामावर हजर राहिले आहेत.

त्याच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने १०० टक्के कामगारांचे वेतन ७ तारखेला केल्याचा दावा केला आहे.

यात मोठ्या संख्येने संपापासून दूर असलेले यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीसह १०० टक्के पगार जमा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!