अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला कृषी मुल्य आयोगाच्या शिफारशीनुसार २८०० रुपये टनाप्रमाणे हमीभाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुळा, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून मिळावा,
या मागणीचे निवेदन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन्ही कारखान्याला दिले. नेवासे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या दोन्ही साखर कारखान्याकडून २४११ हा तुटपुंजा भाव जाहीर करून शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणले आहे.
पंरतु चालू गळीतास येणाऱ्या उसाला २८०० रुपये भाव मिळाला पाहिजे. तसेच उसाची रिकव्हरी अत्यंत कमी दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान, तर होतेच पण उसाच्या वजनात गोंधळ दिसत आहे.
यासाठी तालुक्यात भरारी पथक नेमावे. उसापासून साखर तयार होते. पण कारखान्याकडून अन्य उपपदार्थ तयार होतात. याचा मोठा नफा कारखान्याला मिळतो.
यातून मात्र शेतकऱ्यांना वाटा मिळत नाही. तेव्हा दोन्ही साखर कारखान्याकडून २८०० रुपये भाव जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,
दत्तात्रय काळे, अंकुश काळे, प्रताप चिंधे, अण्णा पाटील गव्हाणे, कैलास दहातोंडे, येडूभाऊ सोनवणे, अप्पासाहेब कावरे, अरुण गरड,
डॉ. रावसाहेब फुलारी, थोटे पाटील, भरत शिंदे, अरुण चांदघोडे, मोतीराम शिंदे अादींसह शेतकरी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम