अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गावठी कट्ट्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. वेगवेगळ्या दोन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूस जप्त केली आहेत.
कारवाईत 51 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक युवक पाथर्डी येथील जुने बस स्थानकाजवळ गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. त्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तिथे सापळा लावला.
त्यावेळी छोट्या ऊर्फ सोहेल राजू पठाण (वय 22 रा. मेहेरबाबा टेकडी ता. पाथर्डी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.
सावेडीतील तपोवन रोडवर मनोज लक्ष्मण झगरे (वय 30 रा. गुंडू गोडावून पाठीमागे, सावेडी) याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईवरून अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्ट्यांची गल्लीबोळात विक्री होत असल्याचे दिसते आहे.
येणार्या काळात हेच गावठी कट्ट्यांमुळे टोळीयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम