अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- लग्नात मुला – मुलीच्या सोबत फोटो घेण्याच्या नादात वराच्या आई-वडिलांनी खुर्चीवर ठेवलेल्या बॅगेतील दागिने ,रोख रक्कम, मोबाईल व घड्याळ असे एकूण 1 लाख तीस हजार किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेली घटना राहाता तालुक्यातील साकुरी येथील एका मंगल कार्यालयात घडली.
याप्रकरणी अॅड. चंद्रकांत बाबुराव टेके यांनी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुरी येथे एका मंगल कार्यालयात माझा मुलगा आदित्य याचे लग्न होते.
आम्ही कुटुंबातील सर्व नातेवाईक वधू -वर यांच्या जवळ स्टेजवर उभे होतो. फोटो काढण्यासाठी आमच्या जवळील असलेली बॅग खुर्चीवर ठेवली.
फोटो काढल्यानंतर बॅग घेण्यासाठी गेलो असता खुर्चीवर ठेवलेली बॅग तिथे नव्हती. तेव्हा आम्हाला खात्री झाली की आमची बॅग चोरीला गेली आहे.
चोरी गेलेल्या बॅगमध्ये 85 हजार रोख रक्कम 25 हजारांचे दागिने 10 हजार किमतीचा मोबाईल 10 हजार किमतीचे घड्याळ अशी एकूण रक्कम 1 लाख 30 हजार रुपये चोरी गेले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम