निवेदन देण्यासाठी गेलेल्या तक्रारदारांना पोलीस निरीक्षकाची अरेरावी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- चोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन व्यापारी संघटना करणार असल्याचा निवेदन देणार्‍या राहुरीच्या व्यापार्‍यांना अरेरावी करीत त्यांना राहुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली.

या पोलीस अधिकार्‍यांची पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राहुरी शहर तथा परिसरात मोठ्या प्रमाणावर चोर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे.

तसेच व्यापारीपेठेत भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. याबाबतचे निवेदन व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहुरी पोलिस ठाण्याला दिले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चोर्‍या, दरोडे पडत आहेत.तसेच दुचाकी, मोबाईल चोरांचे देखील प्रमाण वाढले आहे. यातच आता पोलीस निरीक्षक इंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून चोरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.

वेळीच चोर्‍यांचा तपास तात्काळ करावा व भविष्यकाळात चोर्‍या होणार नाहीत, याच्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. भविष्यकाळात चोर्‍यांचे सत्र न थांबल्यास व्यापारी असोसिएशनच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe