कोरोनाची लस कोणत्या वेळेत घ्यावी… संशोधनातून माहिती आली समोर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस सकाळच्या वेळेस घेण्याऐवजी दुपारच्या वेळेस घेतल्यास तो अधिक प्रभावी ठरतो, असा दावा ब्रिटनमधील संशोधकांनी केला आहे.

यासाठी मानवी शरीरात दिवसभरात होणारे बदल कारणीभूत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. रुग्णांवर दुपारच्या सुमारास औषधांचा प्रभाव अधिक होतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

यासाठी संशोधकांनी इन्फ्लूएंजा लसीकरणाच्या एका अभ्यासाचा देखील हवाला दिला आहे. ब्रिटनमधील २,१९० आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोनारोधी लसीकरणाची चाचणी करण्यात आली आहे.

त्यानुसार सकाळच्या तुलनेत दुपारी लस घेतलेल्या लोकांमध्ये अधिक व्यापक प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळले. अभ्यासानुसार लसीकरणासाठी दुपारची वेळ अधिक प्रभावी आढळल्याचे मॅसाचुसेट्स जनरल हॉस्पिटल (एमजीएच) मधील संशोधनाच्या सह-वरिष्ठ लेखिका अलिझाबेथ क्लेअरमॅन यांनी सांगितले.

संशोधकांनुसार काही आजारांमधील लक्षणे आणि अनेक औषधांचा प्रभाव दिवसाच्या वेळी अधिक प्रभावीपणे दिसून येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe