अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- म्हणाले…विरोधकांशी चांगले संबंध मात्र मी कधीही निवडणुकीत फिक्सिंग केली नाही राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यामुळे त्यांचा सोबत येण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, शिवसेना राष्ट्रवादीसोबत येण्यास तयार असेल तर राष्ट्रवादी देखील दोन पावलं पुढे सरकेल, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
पक्षांतर्गत बंडखोरी आणि निवडणुकीत होणाऱ्या कुरापतींवर बोलताना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. माझेही विरोधकांशी चांगले संबंध आहेत, पण मी कधीही निवडणुकीत फिक्सिंग केली नाही, असंही पवारांनी नमूद केलं.
ते पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता शिबिर मेळाव्यात बोलत होते. जे आपल्या बरोबर येऊ पाहत आहेत त्यांनी पण राष्ट्रवादीची ताकद किती आहे
त्या ताकदीच्या प्रमाणात जागा वाटप झाल्यास काहीच अडचण असण्याचं कारण नाही. दोघांचं ध्येय एकच आहे, भाजपला पराभूत करायचं आहे.”
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम