कष्टांनी वाढवलेल्या पिकांवर बदललेल्या हवामानामुळे रोगराईचे संकट

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- बदललेल्या हवामानाचा रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेक रोग आक्रमण करू लागले आहेत. हंगामातील प्रमुख असलेल्या कांदा पिकाला याचा मोठा फटका बसत आहे.

त्यामुळे ही बाधित पिके वाचविण्यासाठी महागडय़ा औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतक:यांवर आली असून, पिके वाचविण्याची त्याची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकरी मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा संकाटांनी ग्रासला आहे. आता मोठ्या कष्टांनी वाढवलेल्या पिकांवर बदललेल्या हवामानामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रार्दुभाव वाढत आहे.

दरम्यान कांदा पिकाला करपा रोगाने ग्रासलेले होते. त्यातच आता कांद्यावर पिळ रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

कर्जत तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या कांद्याचे या रोगाने मोठे नुकसान झाले. काही दिवसांपासून पिळ रोगाने कांद्याला ग्रासल्याने पूर्ण पिक जमीनदोस्त झाले.

रोपांची खरेदी, लागवड, खते यावर केलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कुळधरण, तळवडी, बारडगाव आदी भागातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकात नांगर फिरवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe