अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- ज्या माणसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा विकृत प्रवृत्तीला पुन्हा जिल्हा परिषदेत उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. उमेदवारी देणार्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल करत.
गोविंद मोकाटे याचा सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ अगोदर मंत्री यांनी तपासून पहावा, मग माझ्या विरोधात भाष्य करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
तिसगावमध्ये एका कार्यक्रमात कर्डिले बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदारांसाठी दारू कोणी आणली. तुम्ही व तुमचे लोक दारू वाटत फिरले.
तुमच्यामुळेच आठ ते नऊ लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आमच्यावर आरोप करणे बंद करा, तुमची खोटी सहानुभूती आता लोकांनी ओळखलीय.
दिवसा लोकांची सहानुभूती मिळवायची आणि रात्री मात्र रंगीले चाळे करायचे हे आता जनतेने ओळखलयं. या शब्दांत कर्डिले यांनी गोविंद मोकाटेवर थेट निशाणा साधला. आमच्यावर खोटे आरोप करून विनाकारण जेलमध्ये पाठवले, मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्ततता करत आम्हाला न्याय दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम