‘या’ परिसरात बिबट्याचा समूह असण्याची शक्यता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  उक्कलगाव व पटेलवाडी परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आले आहे.(leopard news)

शुक्रवारी रात्री बिबट्याने बेलापूर-कोल्हार रोडवरील उक्कलगाव येथे शेतात वस्ती करून राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय नामदेव मोरे यांच्या घराचे कंपाउंड तोडून घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप मारून त्याला ठार केले.

दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी उक्कलगाव-पटेलवाडी रोडवरील थोरात वस्ती येथे विलास नानासाहेब थोरात यांना रात्रीच्या सुमारास घरामागील द्राक्ष बागेत बिबट्या दृष्टीपथास पडला.

उक्कलगाव-खंडाळा रोडवरही काहींना दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिले. हे बिबटे संख्येने किमान चार ते पाच तरी असावेत असा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज आहे. सध्या लोड शेडिंगमुळे वीजपुरवठा कमी होतो.

त्यामुळे शेतकरी रात्री-अपरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जातात. शेतात दबा धरून बसलेला बिबट्या कधीही त्यांच्यावर हल्ला करू शकतो.

वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामे करतात, पिंजरे लावतात पण त्यात बिबट्या अडकेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे शेतात पाणी भरण्यासाठी जाताना टॉर्च,

काठी व समुहाने जाणे गरजेचे आहे. तसेच बिबट्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe