शेतकर्‍यांच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज देण्याचा जिल्हा बँकेचा विचार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-  कोरोनामुळे आर्थिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेती तारण ठेवून शेतकर्‍यांच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याचा जिल्हा बँकेचा विचार आहे.

याबाबतची माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सेवा संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक स्वावलंबी करण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांना गाई, म्हशीसह ट्रॅक्टरसारखी शेती अवजारे घेण्यासाठी 300 कोटींचे कर्ज वाटप केले.

तर साखर कारखान्यांसाठीही 300 कोटींचे कर्ज वाटप केलेले. मागील वर्षी देखील 400 कोटींचे कर्ज शेतकर्‍यांना वाटप केले. त्याची शेतकर्‍यांनी परतफेड केली,

असल्याची माहिती कर्डिले यांनी दिली. तालुक्यातील इतर संस्थांनी देखील या संस्थेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन कर्डिले यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe