विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : ऑनलाईन परीक्षांचा मार्ग कायम स्वरूपाचा असल्याचा गैरसमज चुकीचा : उदय सामंत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :-  कोविड १९ मुळे शाळा, महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोना काळात ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या.

पण आता कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये हळूहळू पूर्वपदावर येयला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण देण्याची भूमिका राज्य शासनाने कधीच घेतली नव्हती.

कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या. आता हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडे आले पाहिजे. ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपीचा असल्याचा गैरसमज साफ चुकीचा आहे.

असे राज्याचे उसाचं व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील असे दिसत आहे. शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अंदाज वर्तवला जात आहे.

ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील असे वाटत आहे.

विद्यार्थी आणि पालकांची अशी मागणी आहे की, महाविद्यालयांबरोबरच शाळांच्याही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हाव्यात. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना चा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News