अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- येथील बालकल्याण समितीच्या कार्यालयात प्रवेश करून अध्यक्ष हनिफ मेहबुब शेख यांच्यासह सदस्यांवर शाई फेक करणारा आदिवासी युग प्रवर्तक सामाजिक विकास प्रतिष्ठानचा अध्यक्ष ईश्वर देविदास काळे (रा. बारडगाव दगडी ता. कर्जत) याला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
काळेसह 10 ते 15 जणांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 6 सप्टेंबर 2021 रोजी ही घटना घडली होती.

ईश्वर काळे याच्या युग प्रवर्तक प्रतिष्ठान संचलित यशोधरा मुला-मुलींचे वसतिगृह बारडगाव दगडी येथे आहे. त्याठिकाणी 10 मुले अनाधिकाराने ठेवण्यात आली आहे.
त्या वसतिगृहाला कुठलीच मान्यता नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. याच प्रकरणावरून काळे हा इतर साथीदारांना घेऊन बालकल्याण समिती येथे आला.
त्याने शेख व त्यांच्या इतर सहकार्यांना शिवीगाळ करून निळ्या रंगाची शाई फेकली. तसेच त्याच्या पत्नीने शेख यांना मारहाण केली होती.
याप्रकरणी शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काळे पसार झाला होता. कोतवाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम