अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरातील सामाजिक संस्थांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे एक तक्रार केली होती. यामध्ये लसीकरण केंद्रावर लस न घेता प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला होता.(amc news)
आता याच प्रकरणी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. आता या सर्व प्रकरणाची तात्काळ मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दखल घेत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांना देण्यात आले.

त्यांनी मंगळवारी महापालिकेच्या माळीवाडा येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली व सदर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी डॉ. गणेश मोहोळकर यांच्याकडे चौकशी करण्याचे आदेश दिले.
याप्रकरणी डॉ. राजूरकर म्हणाले की, कोणत्याही दबावाला न घाबरता महापालिका आरोग्य कर्मचार्यांनी काम करावे, आपण चुकीचे काम करू नका. पण चुकीचे काम केल्यास त्यांची गय केली जाणार नाही.
तसेच संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. याच बरोबर दररोज दिले जाणार्या लसीकरणाचा व लसीकरण प्रमाणपत्र नोंदणीचे तपशील तपासले जाणार आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाला नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम