अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.(leopard news)
यातच नगर तालुक्यातील देहरे टोल नाका भागात पांढरी वस्ती तसेच काळे व कपाले वस्ती भागात चार पाच दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे.

या संदर्भात जिल्हा उपवनसंरक्षक सुवर्णा माने व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. जगताप यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. दरम्यान विळद व देहरे परिसरात अनेक वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे.
मात्र त्यांच्याकडून मानवास कोणताही उपद्रव झालेला नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घाबरून न जाता सायंकाळनंतर शेतात जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऊसतोड करताना विशेष काळजी घ्यावी. पिले आढळून आल्यास त्यांना न हाताळता हा परिसर निर्मनुष्य करून तत्काळ वन विभागास माहिती द्यावी,
असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम