अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन @ 6280 रुपये क्विंटल

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 4127 गोण्यांची आवक झाली.(Soybean price)

प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2800 रुपये इतका भाव मिळाला.

सोयाबीनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2500 ते 3000 रुपये तर लाल कांद्याला 2400 ते 2800 असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1650 ते 2450 रुपये, लाल कांद्याला 1550 ते 2350 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 700 ते 1600 रुपये तर लाल कांद्याला 600 ते 1500 भाव मिळाला.

गोल्टी उन्हाळी कांद्याला 1900 ते 2100 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 600 रुपये व लाल कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 35 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 प्रतिकिलोला 46 ते 75 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंब नंबर 2 ला 36 ते 45 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 11 ते 35 रुपये तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 10 रुपये इतका भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News