अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- ओमायक्राॅनचा रूग्ण आढळून आल्याची चर्चा नगरमध्ये सुरू असल्याने नागरिक धास्तावले.(Omicron )
परंतु, ही अफवा असून ओमायक्राॅनचा एकही रूग्ण नगरमध्ये नाही, असे आयुक्त शंकर गोरे यांनी स्पष्ट केले.
सबंधित रूग्ण परदेशी किंवा राज्याबाहेरील नाही. आरोग्य विभागाने तशी यादीही तपासली आहे.
संबंधित रुग्ण कोरोना पॉझििटव्ह आहे, ओमायक्रोन व्हेरिएंट पॉझिटिव्ह नाही. ओमायक्राॅनची चाचणी देशातील मान्यताप्राप्त लॅबमध्येच केली जाते, असे आयुक्त गोरे यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम