भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना नगर मनमाड रोडवरील विळद घाट परिसरात घडली आहे.(Ahmednagar Accident news)

या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहनचालाकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या अपघातात विनोद मधुकर गवाळे रा. निंबळक वय ३७ असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

यासंदर्भात निकिता गवाळे यांनी एमआयसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक फौजदार लोखंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe