‘त्या’ ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर वाहून गेले!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  अरुंद रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात दुधाने भरलेला टॅंकर उलटल्याने हजारो लिटर दूध वाया गेले. टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला आहे. (ahmednagar accident)

दुधाने भरलेला टँकर ब्राम्हणी येथील दुध डेअरीकडे भरधाव वेगाने चालला होता. आरडगाव येथील साळुंके वस्तीशेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या चरात तो उलटला.

त्यामुळे टँकर चालक जखमी झाला.हा शिव रस्ता गेल्या काही महिन्यांपूर्वीच खडीकरण व मुरमीकरण करून दुरुस्त करण्यात आलेला आहे.

या रस्त्यावरून काही वाहनधारक मोठी वाहने ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. या रस्त्यावरून दोन्ही बाजूकडून एकाच वेळी दोन मोठी वाहने आल्यास त्यांना जाता येत नाही.

तसेच दोन्ही बाजूने साईड गटार व शेत असल्याने बाजूने वाहने घेण्यासही मोकळी जागा नाही. त्यामुळेच हा टँकर उलटल्याची शक्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News