बाळाचा जन्म होताच हॉस्पिटलमध्ये मिळणार आधार कार्ड; कसे ते जाणून घ्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :-  सध्याच्या काळात आधार कार्ड हे महत्वाचे दस्ताऐवज झाले आहे. कोणत्याही महत्वाचे कामासाठी आधारकार्ड असणे बंधनकारक आहे.

आधारकार्ड नसेल तर तुमची महत्वाची कामं रखडतात. अगदी पाच वर्षांपासून ते वयोवद्धांपर्यंत सर्वांसाठीच आधारकार्ड महत्वाचे आहे.

अशामध्ये आधार कार्ड तयार करणारी संस्था UIDAIने देशात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नवजात बाळाच्या जन्मानंतर तात्काळ हॉस्पिटलमध्ये त्याचे आधारकार्ड उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

आता आधार कार्ड बनवणारी संस्था UIDAI ने नवजात बाळाच्या जन्मासोबतच हॉस्पिटलमध्ये आधार नोंदणी करण्याची तयारी आहे. UIDAI आणि रुग्णालयांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत नवजात बालकाचं आधार तयार करत नव्हते.

कारण वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात. मात्र आता नवजात बालकाला जन्मासोबतच आधार नोंदणीही मिळणार आहे. UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी सांगितले की, “जन्माच्या वेळी बाळाचा फोटो क्लिक करून आधार कार्ड दिले जाईल.

हे आधारकार्ड त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडले जाईल.५ वर्षापर्यंतच्या मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत. जेव्हा मुलांचे वय पाच वर्षे पूर्ण होईल, तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक्स घेतले जातील. देशातील ९९.७ टक्के प्रौढ लोकांची आधार अंतर्गत नोंदणी झाली आहे.

त्यानंतर आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचे आमचे ध्येय आहे. देशात दरवर्षी २ ते २.५ कोटी मुले जन्माला येतात. आम्ही त्यांची आधारमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करू.

लहानग्यासाठी आधारकार्ड अनिवार्य आधारकार्ड आता लहानग्यासाठी अनिवार्य आहे. ५ वर्षाखालील मुलांकडे आधारकार्ड असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बाल आधारकार्ड दिलं जातं.

मुलांच्या आधार कार्डला ‘बाल आधार कार्ड’ असे नाव दिले आहे आणि त्याचा रंग निळा आहे. याचा उपयोग शाळेत दाखला घेण्यापासून बँकेत खातं उघडण्यासाठी होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News