ॲमेझॉनला तब्बल २०० कोटींचा दंड; जाणून घ्या दंड होण्यामागील कारण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनला एका प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने २०२ कोटींचा दंड ठोठावला.

तसेच ॲमेझॉनने २०१९ मध्ये फ्यूचर कुपन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत केलेला करार देखील रद्द केला आहे. नेमके काय आहे प्रकरण?

जाणून घ्या अ‍ॅमेझॉनने २०१९ सालात फ्यूचर समूहाबरोबर केलेल्या करारामागील ‘वास्तविक हेतू आणि तपशील’ दडवून ठेवले, जे या कराराला मंजुरी मिळविताना पुढे आणणे अत्यावश्यक असते. वास्तवाची अशा रीतीने दडपणूक करून खोटे चित्र स्थापित केले गेले, असा सुस्पष्ट ठपका स्पर्धा आयोगाने ५७ पानी आदेशात अ‍ॅमेझॉनवर ठेवला आहे.

यामुळे त्या कराराची नव्याने तपासणी करणे आवश्यक आहे आणि तोवर त्याला पूर्वी दिली गेलेली मान्यता ‘तहकूब’ करीत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. अ‍ॅमेझॉनच्या बाजूने या गोष्टी जाणूनबुजून केल्या गेल्या, जेणेकरून या कराराची वास्तविक व्याप्ती आणि उद्देश दडपला जाईल.

या कारणासाठी अ‍ॅमेझॉनवर दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला. तर फ्यूचर कूपन्समधील ४९ टक्के भागभांडवल तीन स्तरावरील व्यवहारांद्वारे विकत घेण्याशी संबंधित संयोजन हे विहित शर्तींनुसार सूचित करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल अतिरिक्त २०० कोटींचा दंड देखील या मक्तेदारी प्रतिबंधक नियामकाने ठोठावला आहे.

सीसीआयच्या ५७ पानांच्या आदेशात म्हटले आहे की, फ्यूचर ग्रुपशी संबंधीत झालेल्या सर्व सौद्यांची चौकशी करणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये देणयात आलेल्या यासंदर्भातील मंजूरीस तोपर्यंत स्थगिती दिली जाईल.

सीसीआयच्या आदेशात म्हटले आहे की, ॲमेझॉनने आपले व्यवहार ‘वास्तविकतेच्या कक्षेत लपवले’ आणि अनुमोदनाची मागणी करत ‘चुकीचे आणि खोट्या प्रतिक्रिया’ दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe