मंत्री तनपुरे म्हणाले…तर विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पसंख्यांक, बहुजन समाजाच्या हिताचे असून कोणी कितीही म्हणत असले हे सरकार पडणार. तर मी म्हणेन पुढच्या पंचवार्षिकला देखील महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येणार आहे. (Minister Prajakt Tanpure)

असे प्रतिपादन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला. इतरांचे व्हिडिओ व्हायरल करून त्यांना बदनाम करण्यापेक्षा आपल्या तोंडामुळे स्वत:चे किती नुकसान झाले याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचा अथवा बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही अशा शब्दात त्यांनाही उत्तर देऊ अशी टीक तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर केली.

तिसगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्यमंत्री तनपुरे बोलत होते. यावेळी तनपुरे म्हणाले मतदार संघाच्या विकास कामासाठी भरपूर निधी आणण्याचे काम व सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला वेळ कमी पडतोय.

त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्यास देखील वेळ मिळत नाही. काही लोकांच्या डोक्यात नेहमी घाणेरडे विकृत विचार येतात. त्यांना जनतेने डोक्यावर अपटवले तरी देखील यांचे विचार बदलत नाहीत. अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe