अज्ञात चोरट्यांचा कापड दुकानावर डल्ला; नगर तालुक्यातील घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथे कापड दुकान फोडून 55 हजार रुपयांचे कपडे व अडीच हजार रुपयांची रोख रक्कम असा 57 हजार 500 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.

दुकानाचे मालक नरेंद्र विनायक झरेकर (वय 44 रा. देऊळगाव सिद्धी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, झरेकर यांचे देऊळगावमध्ये कापड दुकान आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्यानंतर चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातील साड्या, लहान मुलांचे कपडे व रोख अडीच हजार रुपये असा 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक फौजदार बी. वाय. लबडे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe