अशोक कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जाची आज छाननी होणार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच साखर कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Factory)

नुकतेच श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी आज सोमवार (दि 20) रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा बँकेच्या कार्यालयात सुरुवात होणार आहे.

दरम्यान अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 16 जानेवारी रोजी मतदान, 17 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

छाननीच्यावेळी उमेदवार किंवा त्यांचे सूचक यापैकी एकाच व्यक्तीला हजर राहता येणार आहे. छाननी कक्षात प्रवेश करताना उमेदवार अथवा सूचक यांनी छाननी स्लिप व स्वतःचे फोटो ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

छाननीचे कामकाज गटनिहाय पद्धतीने करण्यात येणार असून उमेदवार अथवा सूचक यांनी ठरलेल्या वेळेतच याठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे.

दाखल अर्जासंबंधी हरकत असल्यास त्या त्या गटाची छाननी सुरू होण्यापूर्वी हरकत अर्ज लिखित स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावयाचे आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पुरी काम पाहत आहेत. तर मतदारांसाठी गावागावांतच मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती पुरी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe