अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरीच्या कारागृहातील कुख्यात सागर भांड टोळीने खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले. पळालेल्या ५ पैकी ३ कैद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २ कैदी पसार आहेत.(Ahmednagar news)
त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सागर अण्णासाहेब भांड (वय २५, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे),
किरण अर्जुन आजबे (वय २६ रा. भिंगार), नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय २२ रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा), रवी पोपट लोंढे (वय २२ रा. घोडेगांव, ता. नेवासा),
जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे (वय २५ रा. टाकळीमिया, ता. राहुरी) अशी कारागृहातून पळालेल्या कैद्यांची नावे आहेत. दरम्यान राहुरी कारागृहात एकूण १७ कैदी आहेत.
त्यात, टोळी प्रमुख कुख्यात सागर भांड सह ५ जण न्यायालयीन कोठडीत होते. कारागृहाच्या मागील भिंतीच्या छता जवळील खिडकीचे नऊपैकी तीन गज कापण्यात आले.
टोळीतील पाच जण खिडकीतून बाहेर पडले. बाहेरील लोखंडी जाळी तोडून, कारागृहाची भक्कम सुरक्षा भेदून पलायन केले. टोळी प्रमुख सागर भांड व किरण आजबे यांना अवघ्या पंधरा मिनिटात पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
नंतर कैद्यांनी पलायन केल्याचे लक्षात आले. दरम्यान राहुरीची पाच व स्थानिक गुन्हे शाखेची दोन अशी सात पोलीस पथके पसार तीन गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम