अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime)

यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर),

राजधारी रामकिशोर यादव (रा. उत्तरप्रदेश) आणि श्रीकांत दत्तात्रय खोरे (रा. मुळेवाडी ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नाव आहेत.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार अनिल कोठारी याच्या डांबर मिक्सिंग प्लॉटच्या वाहनांमध्ये बायोडिझेल इंधन म्हणून वापरले जात होते. या टँकर सोबत असलेल्या पावतीवर सिल्वासा ते अहमदनगर असा पत्ता होता.

आरोपीच्या जबाबानुसार या बायोडिझेलचा वापर डंपर आणि इतर वाहनांना इंधन म्हणून वापरला जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान याप्रकरणी कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कर्जत पोलिसांनी ज्वलनशील पदार्थ पकडला आहे.

याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहे. अहवाल आल्यानंतर ते बायोडिझेल आहे की, अन्य काही याची माहिती समोर येईल. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe