महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात आढळून आले टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील कारवाईचे काही धागेदोरे जिल्हयातील संगमनेर तालुक्या आढळून आले आहे. याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष,

उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना संगमनेरातून अटक केली आहे. त्यातच आता अटक असणारे परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचे देखील संगमनेर कनेक्शन समोर आले आहे.(Ahmednagar Crime)

सुपे हे काही वर्षापूर्वी हे संगमनेरच्या अध्यापक महाविद्यालयात (डिएड्. कॉलेज) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. यातून सुपे आणि डेरे यांची ओळख होवून पुढे साखळी पध्दतीने हा प्रकार झाल्याचा सशंय व्यक्त होत आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर माजी परीक्षा परिषद आयुक्त डेरेही गजाआड गेले आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक झालेले

आजी आणि माजी आयुक्तांचे संगमनेर कनेक्शन हा योगायोगच की आणखी काही हे आता तपासात समोर येणार आहे. दरम्यान टीईटी पेपर घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या

डेरेंच्या संगमनेर तालुक्यातील काही बडे क्लास चालक नगरमध्ये आहेत. डेरेंच्या संगमनेर कनेक्शनमुळे आता नगर शहरातील ते क्लास चालकही रडावर आले आहेत. संगमनेरच्या डेरेकडून आणखी माहिती हाती लागल्यानंतर प्रकरणाची व्याप्ती उघडकीस येण्यास मदत होणार.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe