अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news)
जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावातील आरोग्य उपकेंद्रवरील आरोग्यसेविका शिंदे यांनी पोलिओ ऐवजी बालकांना काविळीची लस दिली.
यापूर्वी काविळीची लस देण्यात आली होती. डबल वेळा लस दिली गेल्याने बालकांना त्रास होऊ लागला. लसीची रिएक्शन झाल्याने, एक बाळ बेशुद्ध पडलं, तीन बाळांना ताप आला, एकूण सात बालकांना या ठिकाणी लसीकरण झाले होते.
नागरिकांनी जेव्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा सातही बालकांना ताबडतोब सोलापूर शहरातील डॉक्टर कुलकर्णी यांच्या चिरायू रुग्णालयात हलवण्यात आले,
अशी माहिती उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगार यांनी दिली. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रात्री नऊच्या सुमारास माहिती मिळाली असता त्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.
त्वरित त्यांनी सर्व प्रकरणाची चौकशी केली, डॉक्टरांशी चर्चा केली, सर्व बालके सुखरूप असल्याचं त्यांनी सांगत या प्रकरणाची चौकशी केली जाईल,
अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. दरम्यान, सीईओ स्वामी यांनी या प्रकरणाची चौकशी मेडिकल कॉलेजच्या समितीकडून करणार असल्याचे सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम