आज 48 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 65 बाधितांची रुग्ण संख्येत भर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 48 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 71 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.89 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 65 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 408 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 23, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 32 आणि अँटीजेन चाचणीत 10 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये मनपा 01, अकोले 06, कोपरगांव 01, नगर ग्रा. 01, नेवासा 03, पारनेर 03, संगमनेर 03, श्रीगोंदा 02 आणि श्रीरामपूर 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 05, अकोले 01, कोपरगांव 02, नगर ग्रा. 05, पारनेर 04, पाथर्डी 01, राहाता 02, राहुरी 04, शेवगांव 01, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 01 आणि इतर जिल्हार 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 10 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 03, अकोले 01, कर्जत 02, राहुरी 01, संगमनेर 01 आणि श्रीगोंदा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 04, अकोले 03,

जामखेड 02, कोपरगाव 01, नगर ग्रा. 02, नेवासा 04, पारनेर 04, पाथर्डी 05, राहाता 01, राहुरी 04, संगमनेर 02, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:3,51,071

उपचार सुरू असलेले रूग्ण:408

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7148

एकूण रूग्ण संख्या:3,58,627

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe