नो व्हॅक्सीन, नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात दररोज किमान 40 ते 70 नव्याने करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशातून कोविड 19 चा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यातच जिल्ह्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आता प्रशासन देखील सतर्क झाले असून नुकतेच जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला महत्वपूर्ण आदेश दिले आहे. जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालय,

खासगी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचा किमान एक डोसची सक्ती केली आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नो व्हॅक्सीन, नो एन्ट्रीचे आदेश काढले आहेत.

लसीकरणाची शहानिशा करा…

विशेष करून लसीकरण न झालेल्या नागरिक समूहात मिसळ्यास त्याचे स्वत:चे आरोग्य धोकेदायक ठरणार आहे. ही बाब विचारात घेवून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश दतांना त्याचे लसीकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानूसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी आस्थापना, कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,

लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सभारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात नो या विषयी सांगोपांग चर्चा करून

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe