काम उरकून ‘तो’ घराकडे निघाला मात्र त्याच्यासोबत घडले असे विपरीत की..!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-  नगरमध्ये असलेले काम आटोपून एक तरुण त्याच्या गावाकडे निघाला होता. मात्र एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या त्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला.

ही घटना शेवगाव तालुक्यातील अमरापूरजवळ घडली. संदीप भानुदास मुखेकर (मुखेकरवाडी ता.पाथर्डी) असे या अपघातात मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील संदीप मुखेकर हा तरूण दुचाकीवरून अहमदनगरहून पाथर्डीकडे जात होता.

सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो शेवगाव तालुक्यातील अमरापूर जवळ आला असता भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

त्यामुळे त्याला प्रथम पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार त्याला अधिकच्या उपचारासाठी नगर येथे घेऊन जात होते. मात्र प्रवासातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe