अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2021 :- तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात पडून असलेली बेवारस वाहने आज मूळ मालकांकडे स्वाधिन करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.(Ahmednagar Police)
गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे १०० वाहने तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती. ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही आजपासून सुरू करण्यात आली आहे.

आज सुमारे २० वाहन मालकांकडे त्यांची वाहने सोपविण्यात आली आहेत. तोफखाना पोलिस ठाणे आवारात सुमारे शंभर वाहने आहेत. तोफखाना पोलिसांकडून या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला.
यामधील सुमारे ६४ वाहन मालकांचा पोलिसांना शोध लागला आहे. यातील २० वाहने आज मूळ मालकांकडे सूपर्द करण्यात आली आहेत. तसेच उर्वरित वाहने येत्या दोन दिवसात मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम