कंटेनर चारचाकीवर आदळला आणि…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- चारचाकी वाहनाला कंटेनरची पाठीमागून जोराची धडक बसली. या धडकेत चारचाकी वाहनातील युवक जखमी झाला आहे.(Acciodent)

विनय अशोक तेलपांडे (वय 21 रा. ललीत नांदेड, पुणे शहर) असे जखमी युवकाचे नाव आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात दुपारी पावणे बारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी युवक तेलपांडे यांनी फिर्याद दिली आहे.

तेलपांडे हे त्यांच्याकडील चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना खोसपुरी शिवारात पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांच्या चारचाकीला धडक दिली.

घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक कावरे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe