अहमदनगर ब्रेकिंग : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अाडीच वर्षे वयाचा मोहम्मद इब्राहिम शेख हा जागीच ठार झाला.(Ahmednagar Breaking)

तर त्याचा भाऊ अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ७) हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना घडली. जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इब्राहिम शेख दूध आणण्यासाठी दोघा मुलांना दुचाकीवरून घेऊन चालले होते. अपघात होताच ट्रॅक्टर चालक पसार झाला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.

या घटनेने वातावरण तणावपूर्ण होते. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी नागरिकांना शांत केले. पोलिसांनी विनानंबरचा ट्रॅक्टर ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe