अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून रस्तापूर, कौठा व देडगाव, चांदा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ चालू असून परिसरात दररोज कोठेतरी शिकार करून जाळीत बंदीस्त असणाऱ्या शेळया नेल्या जातात किंवा भीतीपोटी तिथेच पाळीव प्राणी मरतात.(leopard’s)
कौठा शिवारात मेंढपाळाच्या घोडीचे पिल्लू याची शिकार केली. परिसरात सध्या कांदा लागवड चालू आहे. पंरतु बिबट्याच्या दहशतीमुळे रात्री लागवडी बंद झाल्याने एक तर दिवसाची वीज पुरवठा करावा, अन्यथा याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

रस्तापूर शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दिवसा दर्शन होत आहे. वीज वितरण कंपनीकडे अनेक वेळा दिवसा कृषिपंपासाठी वीज पुरवठा सुरू करावा.
किमान एक महिनाभर जरी दिवसा वीज देण्याचा निर्णय झाला, तर कांदा लागवडी होतील. महिन्याभरात उभ्या उसाचे क्षेत्र कमी होईल. कारण हा बिबट्या उसाच्या शेतात लपवून बसतो.
या बिबट्याने रस्तापूर मचे वस्तीवर दोन दिवसांपूर्वी शिकार केली. त्यामध्ये रात्री १२ ते ८ रात्री वीज पुरवठा होतो. यामुळे रात्रपाळीला शेतीसाठी वीज पंप बंद ठेवावे लागतात. शासनाच्या दिवसा वीज देण्याची घोषणा शेवटी घोषणाच ठरली.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी बिबट्याचा संचारामुळे दिवसा वीज देऊ, अशी घोषणा केली. पण अद्याप ही घोषणा अंमलात आणली नसल्याने नाराजी दिसून येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम